बालेवाडी :
बालेवाडी येथील दी पर्ल सोसायटीतील पूजा मयूर बालवडकर यांचे मंगळसूत्र रोडवरून जात असताना चोरट्याने गळ्यातून हिसकावून नेले. या घटनेनंतर बालेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत चोरट्याचा शोध घेऊन त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून मंगळसूत्र जप्त करून ते पुन्हा पूजा बालवडकर यांना सुपूर्द करण्यात आले.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, महिला पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग आणि महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी बालवडकर परिवाराच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी