पाषाण :
बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी परिसरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष जीवन चाकणकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळे व सोसायट्यांना भेट देऊन बाप्पाची आरती केली. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.
यावेळी मोहन जोशी यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत जीवन चाकणकर यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “चाकणकर यांनी सातत्याने परिसरात पक्षसंघटन बळकट करण्याचे काम केले असून त्यांचा जनसंपर्क आणि नागरिकांशी असलेला आपुलकीचा दृष्टिकोन कौतुकास्पद आहे.”
चाकणकर यांनीही उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना शुभेच्छा दिल्या व परिसराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी