बालेवाडी :
गणेशोत्सवानिमित्त बालेवाडी येथील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज विशेष उपस्थिती लावली.
गणपती बाप्पाच्या दर्शनावेळी दादांनी पुणेकरांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली. मंडपातील भक्तिभावाने सजलेले वातावरण आणि गणरायाचे मनोहर रूप यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे सहकुटुंब मनःपूर्वक स्वागत केले. त्यांच्यासोबत बाणेर-बालेवाडी-पाषाण परिसरातील भाजपा नेते, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच अमोल बालवडकर फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादांच्या स्वागतावेळी अमोल बालवडकर म्हणाले, “गणरायाच्या कृपेने आपल्याला समाजकारणातून लोकसेवेची संधी मिळते. आज दादांच्या उपस्थितीमुळे गणेशोत्सवाचा आनंद अधिक वाढला आहे.”



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन