सुस-म्हाळुंगे :
भोर-मुळशी-राजगडचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी काल सायंकाळी सुस व म्हाळुंगे परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार मांडेकर यांनी मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित गणेशभक्तांशी संवाद साधत सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
गणरायाच्या दर्शनाने प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ही भेट नवी ऊर्जा देणारी ठरल्याचे मत गणेशभक्तांनी व्यक्त केले.
📍 आमदारांनी भेट दिलेली प्रमुख गणेश मंडळे
सुसमधील युवा मराठा मित्र मंडळ, श्री बाल मित्र मंडळ, जय शिवराय मित्र मंडळ, मुंजाबा मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, वाडेश्वर मित्र मंडळ, चौकाचा राजा मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, दख्खनाचा राजा मित्र मंडळ, महादेव नगरचा राजा, शिवालय मित्र मंडळ, काळुबाई नगर, शिवछत्रपति मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, सर्वधर्म मित्र मंडळ तसेच म्हाळुंगेतील लक्ष्मीमाता मित्र मंडळ, मित्रसाह्य तरुण मित्र मंडळ, पिंपळाची तालिम मित्र मंडळ, चिव्हेआळी गणेश मित्र मंडळ, सुर्यमुखी गणेश मित्र मंडळ आणि शिवप्रेमी गणेश मित्र मंडळ यांचा समावेश आहे.
यावेळी आमदार मांडेकर यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पूनम विधाते उपस्थित होत्या.
गणेशभक्ती, उत्साह आणि समाजकारणाचा संगम घडविणारी ही भेट परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी