सूसगाव :
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सूसगाव येथील मा. उपसरपंच सुहास भोते यांच्या जनसंपर्क कार्यालयाला आज सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
भेटीप्रसंगी दादांनी सूसगाव परिसरातील विकासकामांविषयी माहिती घेतली तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सुहास भोते यांनी सहपरिवार त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी कोथरूड विधानसभा भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, भाजपा नेते प्रकाश तात्या बालवडकर, सरचिटणीस सचिन दळवी, ग्रामपंचायत सदस्या धनश्री भोते, भाजपा नेते राहुल कोकाटे, शरद भोते, भाजपा युवा मोर्चा उत्तर मंडल अध्यक्ष अनिकेत चांदेरे, शिवम बालवडकर, गंगाराम मातेरे, नानासाहेब ससार, मा. चेअरमन दिनेश ससार, नवनाथ चांदेरे, मा. उपसरपंच सचिन चांदेरे, मा. उपसरपंच मनिष चांदेरे, मा. चेअरमन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या भेटीनंतर उपसरपंच सुहास भोते यांनी दादांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनामुळे गावातील विकासकामांना नवे बळ मिळेल. त्यांच्या सदिच्छा भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.”
सूसगावमधील ही सदिच्छा भेट कार्यकर्त्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी