बाणेर :
गणेशोत्सवानिमित्त बाणेर येथील बालाजी जेनोरोसिया सोसायटीला पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेब भेट देऊन गणेश आरतीत सहभागी झाले होते. यावेळी सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधताना रहिवाशांनी लहान मुलांसाठी असणाऱ्या अॅमिनीटी प्लॉटवरील दुर्लक्ष, परिसरातील रस्त्यावरील अस्वच्छता तसेच ड्रेनेज लाईन संदर्भातील अडचणी सांगितल्या होत्या.
नागरिकांच्या या तक्रारींना गांभीर्याने घेत चांदेरे साहेबांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आजपासून ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून लवकरच अॅमिनीटी प्लॉटचा प्रश्न तसेच स्वच्छतेसंबंधीचे प्रश्नही मार्गी लागतील. ड्रेनेज लाईनच्या कामसुरु असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर चे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे म्हणाले की, “बाणेर परिसर हा झपाट्याने विकसित होत असलेला भाग आहे. मात्र विकासासोबत नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. सोसायटीतील मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा मिळणे, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण लाभणे तसेच जलनिस्सारणाची योग्य व्यवस्था होणे ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक गरज आहे. या सर्व समस्यांवर आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर राहू.”
समीर चांदेरे यांनी यावेळी सोसायटीतील नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, “आपल्या सर्व मागण्यांचा योग्य तो पाठपुरावा करून उर्वरित प्रश्न देखील माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावले जातील. नागरिकांना दिलेला शब्द पाळणे हेच आमचे कर्तव्य आहे.”



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी