महाळुंगे :
भाजपा कोथरूड विधानसभा पुणे शहर संपर्कप्रमुख काळूराम गायकवाड यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन हा सोहळा उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. श्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते महाळुंगे येथे पार पडला. या प्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला विशेष मान्यवर म्हणून कोथरूड उत्तर मंडळाध्यक्ष मा. श्री लहु अण्णा बालवडकर, मा. नगरसेवक श्री अमोल भैय्या बालवडकर, मा. नगरसेविका सौ. ज्योती कळमकर, मा. नगरसेविका सौ. स्वप्नाली सायकर, पुणे शहर भाजपा चे सरचिटणीस मा. श्री गणेश कळमकर, भाजपा नेते प्रकाश बालवडकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, ह.भ.प. मा. श्री हिरामण पाडाळे पाटील, सुस-महाळुंगे प्रभाग अध्यक्ष मा. श्री राजेंद्र पाडाळे पाटील, मा. श्री लक्ष्मण पाडाळे पाटील, मा. उपसरपंच श्री विवेक खैरे, पिरंगुट गावच्या मा. सरपंच कु. जनाताई गोळे, दीपक हिरामण पाडाळे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन प्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “काळूराम गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेली संघटनात्मक कामगिरी आणि विकासासाठी घेतलेली धडपड कौतुकास्पद आहे. समाजाशी नाळ जपून कार्य करण्याची त्यांची धडपड पुढील काळात नक्कीच अधिक बळकट होईल,” अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही गायकवाड यांच्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा