बाणेर :
बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोड येथील प्राईड प्लॅटीनम चौक रस्त्याचे काम पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबूरावजी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वेलवर्थ सोसायटी ते प्राईड व्हॅलेंसिया रस्त्याचे अनेक महिन्यांपासून अपूर्ण असलेलं काम देखील पूर्ण करण्यात आले आहे.
बाणेर बालेवाडी परिसरात चांदेरे परिवाराच्या वतीने विविध सोसायटीमध्ये नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो. यामुळेच विविध विकासकामे मार्गी लावली जात आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान नागरिकांकडून सांगण्यात आलेल्या समस्या लवकरच सोडवण्यात येतील असा आपण शब्द आम्ही दिला होता जो पूर्ण केला जात आहे. लवकरच या पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कडेचे फुटपाथचे काम देखील पूर्ण होऊन पथदिवेही बसवले जाणार आहेत. नागरिकांच्या सहभागातून आपल्या प्रभागाच्या विकासाची गती अशीच वाढवत ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.
– समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर



More Stories
बालेवाडीत संदीप धारुजी बालवडकर यांच्या वतीने ओपन जिमच्या भूमिपूजनाने आरोग्यदायी उपक्रमांची सुरुवात..
“मिशन निर्मल” अंतर्गत बाणेर परिसरात स्वच्छतेचा धडाका — अमोल बालवडकर फाउंडेशनचा उपक्रम जोरात..
बाणेरकर धाडसी पोलिस कॉन्स्टेबलने वेळेवर मदत करून वाचवला नागरिकाचा जीव!