November 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर बालेवाडी येथील गायत्री तांबवेकरची सायकलिंग मध्ये सुवर्ण कामगिरी..

बाणेर :

चेन्नई येथे सुरू असलेल्या नॅशनल ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप मध्ये बाणेर बालेवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या गायत्री तांबवेकर हिने युथ गर्ल्स (U-14 girls) मध्ये २ km इंडिव्हिजल परशुट (individual pursuit) या इव्हेंट मध्ये ३ मिनिट११.१८० सेकंद टायमिंग देऊन सुवर्णपदक पटकावले आहे.

तिने आत्तापर्यंत विविध सायकलिंग स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला अनेक पदके मिळवून दिली आहेत. या वर्षी तिला स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया ( SGFI) २०२३-२४ ट्रॅक सायकलिंग मध्ये टाईम ट्रायल U-१४ (मुली) प्रकारात सुवर्ण पदक मिळविले आहे.

तसेच अस्मिता खेलो इंडिया ऑक्टोबर २०२३ मध्ये बारामती येथे रोड सायकलिंग मास स्टार्ट मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बाणेर बालेवाडी परिसरात तिचे कौतुक होत आहे.