April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..

बाणेर :

प्रबोधन मंचाच्या वतीने उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकशाहीचा उत्सव 100% मतदानाने साजरा व्हावा म्हणून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध ह्या परिसरात जोरदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

 

विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे म्हणून सोसायटी व वस्ती मध्ये प्रबोधनमंच वतीने पत्रके पोहोचवण्यात आली.

आठवडे बाजार, डी मार्ट सारख्या गर्दीच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले.तसेच मंदिरामध्ये काकड आरतीत उपस्थित राहून शंभर टक्के मतदानासाठी आवाहन करण्यात आले.

प्रबोधन मनपाच्या वतीने शंभर टक्के मतदान करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतल्याने यावेळी जास्तीत जास्त नागरिक मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. मतदारांचे जनजागृती करण्याचे मौल्यवान काम प्रबोधन मंचाने केले आहे.

You may have missed