बाणेर :
सौ. ज्योती राहुल बालवडकर व राहुल दादा उत्तम बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तनिष्का व्यासपीठाच्या संयुक्त विद्यमाने साईदत्त हॉल, बाणेर येथे महिलांसाठी ‘सेल्फ ग्रुमिंग व सेल्फ मेकअप वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तूही मिळविल्या.
आजच्या काळात महिलांनी आत्मविश्वासाने व व्यक्तिमत्त्वपूर्ण दिसणे गरजेचे असल्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरावा हा यामागील उद्देश असल्याचे सौ. ज्योती राहुल दादा बालवडकर यांनी सांगितले. पुढील काळात देखील महिलांसाठी विशेष उप क्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वर्कशॉपमध्ये महिलांनी सौंदर्य टिप्स, मेकअप तंत्र तसेच व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन घेतले. यावेळी नामांकित बचत गटांचा सहभाग झाला व त्यांना सन्मानित करण्यात आले. यात –
🔹 सद्गगुरु महिला बचत गट
🔹 एकता महिला बचत गट
🔹 आहिल्या महिला बचत गट
🔹 जिजाऊ महिला बचत गट
🔹 रणरागिनी महिला बचत गट यांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी ऋतुजा बालवडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या प्रसंगी भाग्यश्रीताई खिरीड, प्रिन्सिका ताई बराटे, अश्विनीताई समीर चांदेरे, पुजाताई किरण चांदेरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला व युवती पदाधिकारींची प्रमुख उपस्थिती लाभली.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले