बाणेर :
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाचे औचित्य साधून सौ. हर्षदा थिटे यांनी एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करून पंतप्रधान मोदींना मानवंदना दिली.
महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला महिलांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेनंतर महिलांनी त्वरित 1000 ते 1200 कंदील बनविण्याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या. त्यामुळे महिलांना ऐन दिवाळीच्या तोंडावर रोजगाराची आणि पैसे कमविण्याची संधी उपलब्ध झाली.
या कार्यशाळेत लघुउद्योजिका सौ. चैताली यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शुभचिंतन व्यक्त केले. सौ. थिटे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*