बालेवाडी –
बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरात दि. २६, २७ व २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत तीन दिवसांचा भव्य गार्बा महोत्सव “रास रंग दांडिया ३.० – २०२५” पार पडणार आहे.
आरा स्टाईल हाऊस ऑफ फॅशन यांच्या प्रमुखत्वाखाली आणि बालेवाडी वुमेन्स क्लब (BWC) च्या वतीने हा सोहळा आयोजित केला जात असून, पुणेकरांसाठी खास सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. गेल्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाही या दांडिया महोत्सवाबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमात प्रा. रुपाली सागर बालवडकर आणि डॉ. सागर जी. बालवडकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सी एम इंटरनॅशनल स्कूल, किंग्स रॉयल रायडर्स एन्फिल्ड आणि तरंग इव्हेंट्स यांसारख्या संस्थांचा या उपक्रमात सहभाग आहे.
रंगीबेरंगी पोशाख, पारंपरिक संगीत आणि उत्साहवर्धक नृत्याच्या तालावर होणारा हा दांडिया महोत्सव पुणेकरांना एक वेगळाच सांस्कृतिक अनुभव देणार आहे.
👉 स्थळ: बालेवाडी हाय स्ट्रीट, पुणे
👉 दिनांक: २६, २७ आणि २८ सप्टेंबर २०२५
तिकीट विक्री : BOOK MY SHOW वर सुरू





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*