पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुटची इयत्ता 10 वीची विद्यार्थिनी हर्षदा बलकवडे हिने मुळशी तालुका शालेय क्रीडा स्पर्धेत घेतलेल्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरे स्थान मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
🏅 अवघ्या काही सेकंदांच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या स्पर्धेत हर्षदाने आपल्या वेग, दमदार तयारी आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. तिच्या या यशामुळे शाळा तसेच पिरंगुट परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल, प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे आणि विभाग प्रमुख सौ. पूनम पांढरे, सौ. सना इनामदार व सौ. पल्लवी नारखेडे यांचे प्रोत्साहन लाभले.
✨ पेरिविंकल परिवाराचा विश्वास – “हर्षदा जिल्हास्तरावर 100 मीटर धावण्याच्या ट्रॅकवर नवा इतिहास रचेल!” ✨




























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*