बाणेर :
देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे तसेच पुणे महानगरपालिका व आदर पूनावाला यांच्या सहकार्याने आणि स्वच्छ पॅनकार्ड रोड अभियानाच्या समन्वयाने प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी भागात “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते व भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष मा. श्री. धीरजजी घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या अभियानात विशेष उपक्रम म्हणून मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा “स्वच्छतादूत” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच वाहतूक कोंडीतून सुटका करून नागरिकांना मदत करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन टिमचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील व भाजपा शहराध्यक्ष श्री.धीरजजी घाटे यांनी अमोल बालवडकर फाऊंडेशन ने सुरु केलेल्या या “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी हा परिसर संपूर्ण पुणे शहरामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती येईपर्यंत “मिशन निर्मल” हा उपक्रम निरंतरपणे सुरू राहणार असल्याचे मत यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या परिसराला अधिक स्वच्छ व सुंदर बनवावे, असे आवाहनही अमोल बालवडकर यांनी केले.
याप्रसंगी मा. नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर भाऊ तापकीर, ज्येष्ठ नेते श्री. प्रकाशतात्या बालवडकर, मा. नगरसेविका सौ. स्वप्नालीताई सायकर, सौ. ज्योतीताई कळमकर, कोथरुड(उ.) मंडल अध्यक्ष श्री. लहु आण्णा बालवडकर, श्री. गणेशजी कळमकर, श्री. राहुलदादा कोकाटे, श्री.शशिकांतजी बालवडकर, श्री. सचिनजी पाषाणकर, श्री. अनिकेतजी चांदेरे, श्री. काळुराम गायकवाड, श्री. शरद भोते, श्री. राजेंद्र पाडाळे, श्री. सुहास भोते, श्री. शशिकांत बालवडकर, सौ. उमाताई गाडगीळ, सौ. अस्मिता करंदीकर, सौ. कल्याणी टोकेकर, सौ. निकीता माताडे, सौ. वैशाली कमाजदार, सौ. जागृती विचारे, सौ. मिनाताई पारगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कोथरूड उत्तर मंडलातील पदाधिकारी, पॅनकार्ड क्लब रोड स्वच्छता अभियानाचे सदस्य, सर्व मनपा आरोग्य निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी, अमोल बालवडकर फाऊंडेशन, ट्रॅफिक वॉर्डन टिम, अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.




More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले