बाणेर :
बाणेर, सूस आणि म्हाळुंगे हद्दीतील रस्त्यावर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासन, कर्मचारी तसेच विविध सोसायट्यांमधील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
“स्वच्छता हीच सेवा” या भावनेतून सर्वजण एकत्र येऊन काम करताना दिसले. हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक राहिला नाही, तर लोकसहभागातून परिसराच्या प्रगतीसाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी परिसर घडवण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर समीर चांदेरे यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिक, कर्मचारी आणि संस्थांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*