सुस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सूस शाखेच्या इयत्ता बारावी सायन्सचा विद्यार्थी ओजस माझीरे याने बालेवाडी येथे झालेल्या तालुकास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत १९ वर्षांखालील वयोगटात १०० मीटर व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत शाळेचा मान उंचावला.
या विजयामुळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ओजस माझीरे हा आता आणखी मोठ्या मंचावर धाव घेणार आहे. “तालुक्यात सुवर्ण झळाळी, आता जिल्ह्यात ओजसची धाव” अशीच विद्यार्थ्यांमध्ये चर्चा रंगली.
या विद्यार्थ्याला क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर मोरे यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे ओजसने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
क्रीडाक्षेत्रातील या यशामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. “क्रीडाक्षेत्रात पेरीविंकलचा विजयघोष” अशा शब्दांत शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल ,मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांचा कायम असणारा पाठिंबा व प्रोत्साहन कायमच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहवर्धक ठरते. तसेच या यशामागे कणखर नेतृत्व असणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या मागे कायम पाठिंबा म्हणून उभ्या असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्री. सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव व नेहा माळवदे यांचा सदैव पाठिंबा लाभत आला आहे. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळेच विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमध्ये उत्तुंग यश संपादन करण्याची प्रेरणा मिळते.
ओजसच्या या सुवर्णदौडीमुळे पेरीविंकल विद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की योग्य मार्गदर्शन, कष्ट आणि चिकाटी यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणे शक्य आहे.


More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*