बालेवाडी :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे व पाषाण परिसरातील नागरिकांसाठी शिवम बलवडकर फाउंडेशन तर्फे भव्य दांडिया महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हा दांडिया उत्सव बुधवार, २४ सप्टेंबर ते रविवार, २८ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजल्यापासून रंगणार आहे.
हा उत्सव शिवम बलवडकर जनसंपर्क कार्यालय, सर्व्हे क्र. १८, कम्फर्ट झोन सोसायटीसमोर, बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे.
महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह बँड व संगीत मैफल, साऊंड व लाईट शो तसेच आकर्षक बक्षिसे व भेटवस्तूंचा वर्षाव अशी विशेष आकर्षणे नागरिकांना अनुभवायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे सह-प्रायोजक म्हणून PNG Exclusive कार्यरत असून, नागरिकांसाठी हा सांस्कृतिक सोहळा अधिक रंगतदार होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन शिवम बलवडकर – उपाध्यक्ष, भाजयुमो पुणे शहर आणि प्रियांका शिवम बलवडकर – सदस्य, भाजप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
📞 संपर्कासाठी: ९९२२२९०२०२
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन आनंद, नृत्य आणि सांस्कृतिक वारसा साजरा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!