April 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील गणेश कळमकर यांची पुणे शहर भाजपा सरचिटणीस पदी निवड…

बाणेर :

बाणेर येथील भाजप नेते गणेश कळमकर यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते देण्यात आले.

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरूड विधानसभेमध्ये सर्वांना एकत्रितरित्या सोबत घेऊन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना विजयी करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावल्याने आणि कायम संघटनात्मक बांधणीमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गणेश कळमकर यांच्या निवडीमुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी सोमेश्वर वाडी, सुस, म्हाळुंगे परिसरात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्ष संघटन अधिक मजबूत होणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून संघटनात्मक काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमीच मला वेगवेगळी जबाबदारी देत माझ्यावर विश्वास दाखविला आहे. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहोचवण्यात व पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी मी अग्रेसर राहणार आहे. तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून मी काम करेल.

गणेश कळमकर (सरचिटणीस,पुणे शहर भाजपा)