बाणेर :
बाणेर येथे जानेवारी २०२४ मध्ये केलेल्या यशस्वी आयोजनानंतर येणाऱ्या नवीन वर्षात रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी हजारो स्त्रियांच्या सहभागासह पुणे शहरात प्रथमच आयोजित ‘उडान नारी शक्ती रन २०२५’ चे आयोजन पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष सौ. पुनम विशाल विधाते यांच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या रन मध्ये ७५०० महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून ‘उडान नारीशक्ती रन’ माध्यमातुन हजारो महिला गतवर्षी सहभागी झाल्या. महिलांना आपण देखिल शारिरीक व मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहोत हा आत्मविश्वास दाखविण्याची संधी ‘उडान नारीशक्ती रन’ माध्यमातुन उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी देखील महिला अधिक उत्साहात रनमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या परिसरातील महिलांना विनंती आहे की नारीशक्तीच्या ह्या अभूतपूर्व उत्सवात सहभागी व्हावे : सौ.पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस/अध्यक्ष : वामा वुमन्स क्लब
‘उडान नारीशक्ती रन’ – महिलांसाठी एक प्रेरणादायक मॅरेथॉन!
पुण्यातील महिलांसाठी एक अद्वितीय आयोजन! चला, आपल्या सामर्थ्याला वाव देण्यासाठी नारी शक्ती रनमध्ये सहभागी होऊया! तुमच्या सहभागाने केवळ तुमच्या सशक्ततेला वाव मिळणार नाही, तर इतर महिलांसाठी देखील प्रेरणा होईल.
I am interested for marathon.