April 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगाव येथील सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील गणेश मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ समीर चांदेरे यांच्या हस्ते संपन्न..

सुसगाव :

सुसगाव येथील सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील गणेश मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला.

 

सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील सभासद पुढाकार घेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवतात. सोसायटीला उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. शिवाय विविध उपक्रमासाठी आम्ही सहकार्य करण्याच्या भूमिकेत नेहमीच असल्याने सोसायटी धारकांचे प्रेम आम्हा चांदेरे परिवारावर राहत आले आहे. एक चांगल्या प्रकारचा सभामंडप उभारण्याचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. आम्ही लागेल ती मदत करण्यास अग्रेसर असू. – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)