बालेवाडी :
आज बालेवाडी येथे वास्तव्यास असणार्या सर्व मराठवाड्यातील सर्व बंधु-भगिनिंच्या उपस्थितीत जिंतुर-सेलु मतदार संघातुन प्रचंड बहुमताने आमदार पदी निवडून आल्याबद्दल नगरसेवक अमोल बालवडकर व भाजपा नेते लहुशेठ बालवडकर यांच्या वतीने सौ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सौ.आशाताई बालवडकर व समस्त मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने सौ.मेघनाताई बोर्डीकर यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच मराठवाड्यातील बंधू-भगिनींचे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी आभार मानले.
यावेळी सौ.आशाताई बालवडकर, अनिलतात्या बालवडकर, भाजपा पुणे शहर चिटणीस लहुशेठ बालवडकर, सागर बालवडकर, सुभाष भोळ, सुमित कांबळे, अरविंद सिंग, मराठवाडा सामाजिक फाऊंडेशनचे सभासद तसेच मराठवाड्यातील बंधु-भगिनी व ग्रामस्त उपस्थित होते.
More Stories
पाषाण कोथरूड मधील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलची २५ वर्षांची यशस्वी वाटचाल; दहावी आणि बारावीचा १००% निकाल!
पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधनचे दैदिप्यमान यश: एसएससी बोर्डात पुन्हा १००% निकाल
परिश्रमाचे उमलते फळ – पेरिविंकल पिरंगुटच्या दहावीच्या निकालाने पुन्हा गाठला १००% यशाचा टप्पा!”