बाणेर :
मराठी पत्रकार परिषदेचा दरवर्षी ३ डिसेंबर रोजी साजरा होणारा वर्धापन दिन हा ‘पत्रकार आरोग्य दिन’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. यावर्षीही पुणे शहर मराठी पत्रकार संघाच्यावतीने पुणे शहरातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या निर्देशानुसार व जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबा तारे यांच्या वतीने व मणिपाल हॉस्पिटलच्या आणि मेडिसीन विभाग प्रमुख डॉ.प्रसाद बिवरे व बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश देशपांडे यांचे विशेष सहकार्याने बाणेर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मणिपाल हॉस्पिटलचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ.प्रसाद बिवरे, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश देशपांडे, ह्रदयरोग विभाग प्रमुख डॉ.अभिजीत जोशी,पोट विकार विभागप्रमुख डॉ.प्रसाद भाटे,मेंदूरोग तज्ञ डॉ.चिन्मय कुंभार,अस्थिरोग तज्ञ डॉ.श्रीकांत मडीकट्टू, शिबिर समन्वयक सोमा कर, श्रध्दा झावरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी शहराध्यक्ष बाबा तारे, सरचिटणीस प्रमोद गव्हाणे,पत्रकार मारुती बाणेवार, गुणवंत जाधवर,मोहसीन शेख, अभिराज भडकवाड, अर्जून पसाले आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्व मराठी पत्रकारांच्या स्वाभिमान आणि न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या ८६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवार दि. ३ डिसेंबर रोजी पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या पुणे शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे ‘पत्रकार आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील २६५ तालुक्यात ही शिबिरे संपन्न झाली. त्यात १० हजरांपेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हा जागतिक विक्रम होता. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. राज्यातील ३५४ तालुक्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक पातळीवर सर्व पत्रकारांनी एकत्र येत शिबिरे यशस्वी करावीत असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष हाजी मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी, सहप्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार यांनी केले होते यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पत्रकार संघाच्या वतीने शिबिर यशस्वी करण्यात आले.
More Stories
सोमेश्वरवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर समोरील रस्ता नामदार चंद्रकांत दादांच्या माध्यमातून सचिन दळवी यांच्या प्रयत्नामुळे डांबरीकरण करून दुरुस्त..
सूस येथे होणाऱ्या विकास कामामुळे स्थानिकांना सुविधा मिळून परिसराचा सौंदर्य वाढणार : समीर चांदेरे
बालेवाडी येथे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार संपन्न झाला..