December 4, 2024

Samrajya Ladha

सूस येथे होणाऱ्या विकास कामामुळे स्थानिकांना सुविधा मिळून परिसराचा सौंदर्य वाढणार : समीर चांदेरे

सूस :

सूस येथील प्रकाश नगरसह पूर्ण गावठाण परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचा कामाचा आणि शीतळा देवी मंदिर परिसरातील डांबरीकरणाच्या कामाचा आज शुभारंभ ग्रामस्थ आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या उपस्थित संपन्न झाला.

पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना सुविधा मिळून परिसराचा सौंदर्य वाढणार आहे. लोकांच्या दीर्घकालीन मागण्यांना प्राधान्य देत विकासाच्या दिशेने सातत्याने पाऊले उचलली जात आहेत. प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी आणि मूलभूत सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस

यावेळी काशीनाथराव चांदेरे, अर्जुनआप्पा पाडाळे, नितीन भाऊ चांदेरे, सुखदेव भाऊ चांदेरे, सचिन भाऊ चांदेरे, सुधीरभाऊ सुतार, दिपक भाऊ चांदेरे, चंद्रकांतभाऊ काळभोर, प्रसाद निकाळजे,अशोक निकाळजे, अनिल चांदेरे, प्रल्हाद भाऊ निकाळजे ( मा. ग्रामपंचायत सदस्य सुस गाव ),विवेक निकाळजे, रत्नसागर निकाळजे, शंतनू निकाळजे, राजरत्न निकाळजे,सिद्धांत ससार, सौरभ निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.