बालेवाडी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त बालेवाडी येथे मराठवाडा सामाजिक फाऊंडेशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती आणि राहुलदादा बालवडकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य बाईक रॅली आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या विशेष सहकार्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीदरम्यान माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे, नवनाथ बालवडकर, शिवराज बालवडकर यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. तसेच बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आणि त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जयघोष केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त बालेवाडी येथे आयोजित केलेली बाईक रॅली आणि मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडली.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले