August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये पुस्तकी अभ्यासाच्या व्यतिरिक्त देखील अनोखे मार्गदर्शन

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या शाखेच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील सूस शाखेत शाळेच्या व्यतिरिक्त अनोखे मार्गदर्शन. पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा इतर उपक्रम राबवले जातात. अशाच प्रकारे एक अनोखा उपक्रम राबवला गेला तो म्हणजे एका यशस्वी व्यक्तीची भेट घेवून त्याचं मार्गदर्शन घेणे.

 

इयत्ता दहावीचे विद्यार्थिनी अवंतिका विकास सोनवणे ही 15 मे रोजीआय.ए.एस अधिकारी जितेंद्र दुडी जे सध्या महाराष्ट्रातील पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करतात यांच्याशी भेट घेवून चर्चात्मक संवाद साधला. इयत्ता १०वी ला इंटरव्ह्यू नावाचा एक ४ मार्क्स चा प्रश्न विचारला जातो तर केवळ पुस्तकात किंवा वहीत न लिहिता प्रॅक्टिकल नॉलेज वर भर देऊन इंग्लिश च्या शिक्षकांनी एका यशस्वी व्यक्तीची किंवा IAS अधिकाऱ्याची भेट घेवून त्यांचा इंटरव्ह्यू किंवा चर्चात्मक संवाद सांगितला होता.

त्यांच्या वेळेचे नियोजन त्यांनी मिळवलेले उत्तुंग यश अभ्यास करण्याची पद्धती या सर्व अनेक गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्या विद्यार्थिनी तेथे गेल्या होत्या. मे महिना सुट्टीचा असून देखील पेरीविंकल शाळेतील सूस शाखेतील विद्यार्थि एक अनोखा उपक्रम राबवत होते. हा उपक्रम जुनिअर कॉलेज एच ओ डी .श्री सचिन खोडके सरांनी दिला होता आणि विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडला. असेच वेगवेगळे उपक्रम अभ्यासाव्यतिरिक्त शाळेमध्ये राबवले जातात म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा इतर गोष्टींची जाण होते आणि त्या गोष्टींमध्ये ते परिपक्व होतात.

पेरीविंकल स्कूल ही शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवते ज्यामध्ये अभ्यासाबरोबरच समग्र विकास लवचिकता, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन,समता आणि समावेश या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले जाते .

प्रशालेच्या मुख्याध्यापक सौ.निर्मल पंडित विद्यार्थ्यांना नेहमी कृतीतून चर्चात्मक पद्धतीने अभ्यास कसा करायचा हे नेहमीच सांगत असतात. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नको, तर प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित या वेळोवेळीच मोलाची भूमिका बजावत असतात.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक मा श्री राजेंद्र बांदल सर , संचालिका रेखा बांदल, व शिवानी बांदल यांचे उत्तम मार्गदर्शन व शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे चोख नियोजन तसेच पर्यवेक्षिका नेहा माळवदे , सचिन खोडके व स्मिता श्रीवास्तव यांचे योगदान नेहमीच महत्वपूर्ण ठरते.

 

You may have missed