बाणेर :
जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून बाणेर-बालेवाडी परिसरात ‘सिटी सायक्लोथॉन २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर आणि भाजपा पुणे शहर सरचिटणीस श्री. गणेश कळमकर यांच्या संयोजनातून साकारलेल्या या सायक्लोथॉनमध्ये हजारो अबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. “एक पेडल आरोग्यासाठी, एक पेडल पर्यावरणासाठी” या संदेशासह नागरिकांनी सायकल चालवत आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता दर्शविली.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि औंध या भागातील रस्त्यांवर सायकलस्वारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. क्रिकेट आणि फुटबॉल यांसारख्या नेहमीच्या खेळांबरोबरच सायकलिंगची आवडही लोकांमध्ये वाढत आहे, हे या कार्यक्रमातून दिसून आले.
या सायक्लोथॉनमध्ये पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना मान्यवर मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पदके देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ. ज्योती कळमकर म्हणाल्या, “ही केवळ एक सायकल स्पर्धा नव्हती, तर या माध्यमातून आम्ही आरोग्य जपणे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे. नागरिकांचा उत्साह पाहून पुढील कार्यक्रमांसाठी प्रेरणा मिळाली आहे.”
श्री. गणेश कळमकर म्हणाले, “सायकल चालवण्यामुळे आरोग्य सुधारते आणि पेट्रोल-डिझेलचा वापर टाळल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अशा कार्यक्रमांची गरज आहे.”
यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, ‘सिटी सायक्लोथॉन २०२५’ च्या यशस्वी आयोजनामुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिक एकत्र आले आणि “सशक्त आरोग्य, स्वच्छ पर्यावरण” या संकल्पनेतून एक नवी सामुदायिक जागृती झाली. कळमकर परिवार नेहमीच विविध उपक्रम राबविण्यास अग्रेसर असतात.
या कार्यक्रमात भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, मृणाल गायकवाड, निकिता माताडे, जागृती विचारे, मौसमी बोकारे, सुजाता बापट, सुधीर ताम्हाणे, सागर ताम्हाणे,संदीप वाडकर,निलेश सायकर, लखन कळमकर, हेमंत कळमकर, प्रशांत म्हेत्रे यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहर भाजपा सरचिटणीस श्री. गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका सौ. ज्योती कळमकर यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले, ज्याला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
More Stories
बाणेर येथे ज्योती कळमकर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग मार्गदर्शनाचे आयोजन
सोमेश्वरवाडीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मतदार नोंदणी अभियान: बाणेरमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सौ पुनम विशाल विधाते यांचा पुढाकार..