औंध :
बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या नालेसफाई संदर्भातील समस्या लक्षात घेता, काल औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मा. गिरीश व्यं. दापेकर यांना भाजपा पुणे शहर युवा मोर्चाचे उपध्यक्ष शिवम बालवडकर यांनी निवेदन दिले.
यावेळी बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर सहाय्यक आयुक्तांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी परिसरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवम बालवडकर यांनी सांगितले की, “पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी.”
सहाय्यक आयुक्त मा. गिरीश व्यं. दापेकर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या असून लवकरच यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*