May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

रामनदी स्वच्छता अभियानांतर्गत सोमेश्वरवाडी कुंड, फुलपाखरू उद्यान स्वच्छतेचा महत्वपूर्ण उपक्रम…

सोमेश्वरवाडी :

रामनदी स्वच्छता अभियान अंतर्गत सोमेश्वरवाडी येथे एक महत्त्वपूर्ण स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात संत निरंकारी मिशनच्या पाषाण शाखेतील सेवक, पद्मभूषण श्री वसंतदादा पाटील महापालिका शाळा (सोमेश्वरवाडी) यांचे विद्यार्थी व शिक्षक यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

या अभियानाअंतर्गत रामनदी किनारी, फुलपाखरू उद्यान आणि राजमाता जिजाऊ घाट (कुंडांची) परिसराची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली तसेच झाडांना आळी टाकण्याचे कार्य करण्यात आले.

या उपक्रमात स्वच्छता विभाग, पुणे महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे पर्यावरणाची स्वच्छता राखली जाते आणि नदीकिनारी असलेल्या परिसराचा सौंदर्यवर्धन होतो.