March 18, 2025

Samrajya Ladha

सूस शाखेच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये “मराठी भाषा गौरव दिन” मराठी भाषेला जतन करूनउत्साहात साजरा

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये “मराठी भाषा दिन: मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करण्याचा एक दिवस” अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात ओम भूर्भुवस्वः या मंत्राने करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सो निर्मल पंडित व पर्यवेक्षक सचिन खोडके नेहा मॅडम यांच्या हस्ते विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी दिनाविषयी भाषण केले तसेच राज्यभाषा गीत जय जय महाराष्ट्र माझा तसेच माय मराठीची थोरवी कवितेतून विद्यार्थ्यांनी सादर केले भाषेचे महत्व व उपयोग ही सांगण्यात आले भाषेचे अलंकारिक महत्त्व इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी म्हणीतून सांगितले तसेच कृष्णा अंभोरे सर यांनी कुसुमाग्रजांची कविता सादर केली. पर्यवेक्षक सचिन खोडके सर यांनी मराठी विषय बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले मराठी भाषेचा महिमा किती थोर आहे याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले.

मराठी भाषा दिनानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषा स्पर्धांचा समावेश आहे. हे कार्यक्रम मराठी भाषा आणि संस्कृतीची समृद्धता आणि विविधता दर्शवितात.

मराठी भाषा दिन हा मराठी भाषा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तो मराठी भाषिक समुदायामध्ये एकता, ओळख आणि अभिमान वाढवतो आणि त्यांची भाषा, साहित्य आणि परंपरा जपण्यास मदत करतो. कार्यक्रमाची सांगता ‘मराठी पाऊल पडते ‘या गीताने करण्यात आली.

संपूर्ण आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ.रेखा बांदल तसेच शिवानी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षक गण यांच्या मदतीने मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.