बालेवाडी :
भूमाता कृषी मंचच्या वतीने बालेवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील VSR कंपनीच्या विमानाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी संबंधित कंपनीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
होलिका मातेसमोर दुर्गुणांचा तसेच वाईट विचारांचा विनाश व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. या अपघात प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बालवडकर यांनी केली. तसेच तपासात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी गोसेवक संजय बापू बालवडकर, श्री शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक बालवडकर, संदीप बालवडकर, प्रगतशील शेतकरी राजेश चव्हाण, चंद्रशेखर बालवडकर, जालिंदर भंडारी, राजू कविटकर, शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी