पाषाण :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान पाषाण रोड परिसरात सरकारला लक्ष्य करणारे पुणेरी टोमणे असलेले बॅनर्स झळकल्याने पाषाण परिसरात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या बॅनरवर “तुमचं ते लेकरू… आमचं ते कार्ट…” असा उपरोधिक मजकूर झळकवण्यात आला आहे. बॅनरमध्ये एका बाजूला मंत्र्यांची मुले सुखी आणि सुरक्षित आयुष्याबाबत चर्चा करत असल्याचे चित्रण करण्यात आले असून, दुसऱ्या बाजूला जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. या माध्यमातून सत्ताधारी आणि सामान्य नागरिकांच्या मुलांमधील वागणुकीतील कथित दुहेरी निकषांवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर्स लावण्यात आल्याने त्याची राजकीय व सामाजिक स्तरावर चर्चा रंगली आहे.
ही बॅनर्स पाषाण येथील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी