March 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल शाळेच्या पिरंगूट शाखेत महिला दिनानिमित्त आरोग्य जागरूकता व्याख्यान संपन्न..

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोथरूड, पुणे येथील *धर्माधिकारी आयुर्वेद यांच्या डॉ. श्रद्धा जोशी* यांना प्रमुख वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासोबत डॉ. अपूर्वा परळीकर देखील उपस्थित होत्या.

 *“ किशोरवयातील पीसीओडी व हार्मोनल असंतुलन – प्रतिबंधात्मक उपाय आणि आयुर्वेदिक जीवनशैली व्यवस्थापन ”* या विषयावर डॉ. श्रद्धा जोशी यांनी अत्यंत सोप्या व समजण्यासारख्या भाषेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी पीसीओडीची लक्षणे, त्यामागील कारणे तसेच योग्य आहार, नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि संतुलित दिनचर्या यांचे महत्त्व स्पष्ट केले. किशोरवयीन मुलींनी आरोग्याबाबत सजग राहणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.तसेच चुकीची आहारपद्धती, जंक फूडचे वाढते सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि झोपेची कमतरता यामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पौष्टिक व संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, पुरेशी झोप आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले.”हा मार्गदर्शनपर कार्यक्रम इयत्ता ५ वी ते ९ वी मधील मुलींसाठी आयोजित करण्यात आला होता.”

 किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून सांगितले.

 विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टरांनी समाधानकारक उत्तरे दिली. सत्र अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरले.कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल, सर्व शाखा समन्वयक निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या पूनम वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच ऋग्वेद हाऊसचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सीमा कांबळे यांनी केले. 

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित हे आरोग्य जागरूकता सत्र विद्यार्थिनींसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल व भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

 

You may have missed