पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेत आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आजचे प्रमुख पाहुणे श्री ज्ञानोबा शंकर गरुड सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. 27 फेब्रुवारी हा मराठी राज्यभाषा दिन मराठी साहित्यातील महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री.विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
श्री. ज्ञानोबा गरुड सरांनी आपला परिचय करून देऊन मराठी कविता आणि प्रार्थना विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. यावेळी मुलांनीही ताल धरून कवितांचा आस्वाद घेतला. मराठी भाषा बोलणे आणि लिहिणे हा आपला अभिमान आहे तसेच मराठी भाषा केवळ संवादाचे एक साधन नसून ती आपल्या सांस्कृतिक आणि वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितले.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर तसेच संचालिका सौ रेखा बांदल आणि संचालिका कुमारी शिवानी बांदल तसेच मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षिका प्राजक्ता वाघवले आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुवर्णा पोतदार यांनी केले.
More Stories
सुस-महाळूंगे बॉर्डर सोसायटिज असोसिएशनची सर्वसाधारण सभा संपन्न; आगामी महानगरपालिका निवडणुकीत बाबूराव चांदेरे यांना पाठिंबा..
कोथरूड विधानसभासह पुण्यात कुठेही पाणी साचू नये याची दक्षता घ्या! नामदार चंद्रकांतदादा पाटील
सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचा समारोप..’व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांचा सन्मान