बाणेर :
जीवन चाकणकर वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बाणेर येथील सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मिठाई वाटप करण्यात आली.
आपला परिसर स्वच्छ ठेऊन आपल्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी मिठाई वाटप करून ते करत असलेल्या स्वच्छतेच्या कामा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाणेर परिसरातील सर्व कर्मचारी वर्गाला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मिठाई वाटप केली.
–जीवन चाकणकर
उपाध्यक्ष
पुणे शहर राष्ट्रीय काँग्रेस कमिटी (ओबीसी)
यावेळी जीवन चाकणकर वेल्फेअर फाउंडेशन चे पदाधिकारी तुकाराम ताम्हाणे, भाऊसाहेब चाकणकर, महेंद्र गंगावणे, बारणे काका आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
छान उपक्रम आहे, आई जगदंबा आपल्या प्रयत्नांना यश देवो, आणि आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत. आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा
|| प्रल्हाद हेमाडे आणि परीवार ||