बाणेर :
वामा वुमन्स क्लब’ च्या अध्यक्षा सौ. पुनम विशाल विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त होता.
समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विविध तपासण्यांचा लाभ घेतला, तसेच रक्तदानाच्या महान कार्यात सहभाग नोंदवून शिबिराला यशस्वी केले.
मोफत नाडी तपासणी, रक्तदाब, ब्लड शुगर, डोळे, दात तसेच स्त्रीरोग व बालरोग तपासण्या या सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्याचा लाभ सर्वांनी आनंदाने घेतला. शासनाच्या आरोग्य योजनांविषयीही नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार. सर्व नागरिकांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शिबिर अत्यंत यशस्वी झाले. या पुढे देखील असे विविध उपक्रम राबवत राहण्यास प्रोत्साहन मिळाले.
–सौ. पूनम विशाल विधाते ( अध्यक्ष : वामा वुमेन्स क्लब/कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..