January 20, 2025

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर समोरील रस्ता नामदार चंद्रकांत दादांच्या माध्यमातून सचिन दळवी यांच्या प्रयत्नामुळे डांबरीकरण करून दुरुस्त..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर समोरील रस्ता कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून व भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ सरचिटणीस सचिन दळवी यांच्या प्रयत्नामुळे डांबरीकरण करण्यात आला.

 

गेल्या अनेक दिवसांपासून सोमेश्वरवाडी गावात श्री विठ्ठल मंदिर समोरील रस्ता अतिशय दुरावस्थेत होता. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे हा रस्ता चांगला बनवून मिळावा अशी मागणी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे केली असता त्यांनी तात्काळ हा बनवून दिला. सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादांचे खूप खूप आभार. विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर दादांनी लगेच मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी सुरुवात केली.
– सचिन दळवी
सरचिटणीस,
भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल