March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा संपन्न..

पाषाण :

पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा पाषाण आणि बाणेर येथे आज नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महिलांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये एकूण २१ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज संपन्न झाले.

कोथरूड मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. दर्जेदार कामांसाठी नागरिकांनी ही सहकार्य करावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले‌.

यावेळी शहर सरचिटणीस पुनीत जोशी, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक अमोल बालडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा नेते गणेश कळमकर, लहु बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, आबासाहेब सुतार, शिवम सुतार, डॉ. दिलीप मुरकुटे, विवेक मेथा, उत्तम जाधव, ज्ञानेश्वर तापकीर, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, वंदना सिंग, कल्याणी टोकेकर, निकिता माथाडे, सुजाता धनकुडे, लक्ष्मण मेघावत, नवनाथ ववले, प्रवीण आमले, सुभाष भोळ, राजेंद्र पाषाणकर, सतीश पाषाणकर, तुकाई माता मंदिर ट्रस्ट पदाधिकारी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शहरातील नाल्यांवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच,  शहरातील इतर विकासकामांसाठी १०० कोटी रूपये मिळाले आहेत. तसेच, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ही १६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. नागरिकांनी ही विकासकामे सुरु असताना सहकार्याची भूमिका घेतल्यास दर्जेदार कामे होतील, असे आवाहन केले.

दरम्यान, आज भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने राम नदी शुद्धीकरणासाठी इकोफिल्टर बसवणे, बाणेरमधील तुकाई मंदिरासाठी पायऱ्या बांधणे, रामनदीला संरक्षक भिंत उभारणे, रामनदीत सोडण्यात येणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्या बंद करुन नवीन वाहिन्या टाकणे, महापालिकेच्या शाळांमधील विविध विकासकामे करणे, ज्युपिटर हॉस्पिटललगत नाल्यांवर संरक्षक भिंत बांधणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व नाना-नानी पार्क विकसित करणे, योगा सेंटर, ग्रीन गार्बेज आणि घंटागाडी उपलब्ध करून देणे, महापुरुषांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करणे अशी अनेक विविध विकास कामे पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सानेवाडी, विधाते वस्ती, लमाण तांडा, सुस, महाळुंगे, संजय गांधी वसाहत, पंचवटी या भागात होणार आहे.