May 25, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..

बालेवाडी :

बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री फाउंडेशन कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २१ महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याचं बरोबर संस्कृती, कला आणि आधुनिकता यांचा संगम साधत अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला.

 

बालेवाडी येथील जगन्नाथ हाऊस येथे स्त्री फाउंडेशनकडून महिला दिनानिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याची सुरुवात अभिनीती कथ्थक डान्स स्कूलच्या कलाकारांच्या दुर्गा स्तुतीने व युनिटी अकादमीच्या तेजस्वी सादरीकरणाने झाली. त्याचबरोबर’ शेप ऑफ यु ‘या नृत्याचे सादरीकरण करत स्मिता डान्स स्कूलच्या चिमुकल्यानी उपस्थितांची मने जिंकली.

या नंतर समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, खेळ, व्यवसाय रेडिओ जॉकी, डॉक्टर अशा विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या सुपर २१ महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महीलांच्या गृह उत्पादनाला चालना देण्यासाठी छोटे खानी स्टॉल ही उभारण्यात आले होते. त्यामुळे येथे आलेल्या महिलांनी खण्या बरोबरच खरेदीचा आनंद ही लुटला.

स्त्री फाउंडेशनच्या संस्थापिका प्राची सिद्धीकी यांनी सुत्र संचालन, गायिका योगिता बडवे यांनी गायन, मौसमी बकोरे यांनी कलाकट्टा, रिहाना शेखने मेहंदी कट्ट्याचे आयोजन, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी तांबवे, अर्चना देशपांडे, वृषाली रक्षाळे, प्रियांका देशमुख, यामिनी सोनवणे, मृणाल गायकवाड, रुचिता दावर, श्रध्दा गवाली, वनिता जाधव, यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रत्येक स्त्रीच्या अंगी देवी अष्टभुजे इतकी सक्षमता असते, तिचे प्रत्येक अंग विकसित करूयात. प्रत्येक स्त्रीचे सुप्त, असुक्त कला गुण ओळखून त्यांना चकाकी द्यायचे काम करूयात एकमेकांना साथ देऊन समृद्ध होऊयात या स्त्री फाउंडेशनच्या तत्त्वाला धरून हा एक अनुभव संपन्न कार्यक्रम सादर झाला.