February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…

बालेवाडी :

अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे शनिवार 16 मार्च रोजी ममता चौक, बालेवाडी येथे सकाळी 7 वाजता हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बालेवाडी ममता चौक ते वाकड पुल जाणारा रस्ता “बालेवाडी हाय स्ट्रीट 2” चा उद्घाटन समारंभ देखील नामदार चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमांतर्गत खेळ, मनोरंजन, मस्ती, गप्पा, योगा डान्स अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद आपल्या सर्वांना लुटता येणार आहे.

मागील अनेक वर्षापासून बालेवाडी ममता चौक ते वाकड पुल जाणारा रस्ता प्रलंबित होता. नागरीकांच्या मागणी नुसार पाठपुरावा करून या रस्त्याचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद होत असुन लवकरच दुसऱ्या टप्प्याचे काम पुर्ण होऊन वाकड पुलाला हा रस्ता जोडला जाईल. यावेळी आयोजित हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमात विविध प्रकारचे खेळ व करमणुकीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपल्या आयुष्यातील ताणतणाव विसरून सर्वांनी उपस्थित राहून अगदी मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती : अमोल बालवडकर (मा. अध्यक्ष पुणे शहर सुधारणा समिती/ नगरसेवक मनपा)