November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, औंध येथील पुणे महिला मंडळ शाखेच्या वतीने जागतीक महिला दिना निमित्त ‘टॅलेन्शिया’ विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न..

बालेवाडी :

पुणे महिला मंडळ बालेवाडी, बाणेर, औंध शाखेने दिनांक ९ मार्च रोजी जागतीक महिला दिना निमित्त टॅलेन्शिया ह्या विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्या कार्यक्रमात सुमारे 30 सभासदांनी भाग घेतला होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व देवीवंदनाने झाली. पुणे महिला मंडळ अध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी यांनी दिलेल्या सर्व सुचना मंडळ अध्यक्षा सौ अस्मिता करंदीकर यांनी सांगितल्या.

त्यानंतर महिला सभासदांनी विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमात नूरजहान, अस्मिता करंदीकर, किरण गुडदे, मनिषा मुळे व जयश्री जोशी (गीत गायन), संजीवनी औटी,गिरीजा जोशी, अमृता हमिने, राधिका ठोंबरे, रुपा साळवी (कविता वाचन) आणि अर्चना देशपांडे (नृत्य ) सादर केले महिला दिनाचे औचित्य साधून महिला सभासदांनी स्नेहसावली ह्या डॅा वैद्य यांच्या समाजातील निराधार, निरश्रित, ज्येष्ठांसाठी निःशुल्क वृद्धाश्रमासाठी (‘स्नेहसावली-आपलं घर’, देणगी दिली.

कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनाने झाली. या दिवशी ची आठवण म्हणून सर्व उपस्थित सभासदांना कापुरदाणी भेट देण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन महिला मंडळाच्या कार्यकारीणीने केले रुपा साळवी व सई काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयश्री बेंद्रे अणि शुभांगी इंगवले यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष सजावट संजिवनी औटी यांनी केली होती.