November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथे “सेल्फ अवेअरनेस, एम्पॉवरमेंट सिरीज” उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

बालेवाडी :

आपल्या देशाचे पंत प्रधान मोदीजी यांनी योग दिनाच्या माध्यमातून फिट लाईफस्टाईल चा जगभर प्रसार केला.
त्यातून प्रेरणा घेवून कल्याणी टोकेकर आणि निकिता माताडे यांनी महाशिवरात्री आणि महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही “सेल्फ अवेअरनेस, एम्पॉवरमेंट सिरीज” या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत पहिला कार्यक्रम आज बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घेतला. यावेळी सकारात्मक आयुष्याची ऊर्जा देणारे RJ BK तेजस्विनी यांचे व्याख्यान झाले.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अगदी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करतो, रोजचा संघर्ष स्पर्धा यातून वैफल्य येतं. अशावेळी या सगळ्यातून मनावर-मेंदूवर येणारा तणाव कमी व्हावा आणि मनःशांती मिळून स्वतःची आत्मशक्ती विकसित व्हावी यासाठी ध्यानधारणा, spirituality, योगा अशा अनेक गोष्टींची आपल्याला गरज आहे. खास करून महिला, युवा यांना सेल्फ अवेअरनेस आणि एम्पॉवरमेंट मुळे अनेक आव्हानांना तोंड देता येते आणि व्यसनापासून दूर राहता येते.

या उपक्रमास मोलाचे सहकार्य गणेशजी कळमकर यांनी दिले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका ज्योती ताई कळमकर, बालेवाडी विठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष संजयजी बालवडकर आणि भाजप नेते लहू अण्णा बालवडकर, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली कमाजदार, विश्वस्त नंदाभाऊ बालवडकर, भाजप प्रभाग अध्यक्ष सुभाष भोळ, सम्राज्यालढा चे पत्रकार श्री अर्जुन पसाले तसेच बालेवाडी भागातील नागरिक उपस्थित होते.