November 21, 2024

Samrajya Ladha

श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…

बाणेर :

श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर या ठिकाणी 7 व 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री उत्सव व श्री बाणेश्वर देवस्थान वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्याप्रसंगी आदल्या दिवशी होमहवण तसेच महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 7.30 वाजता आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्यावतीने महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये स्वामी प्रणील जी त्याचबरोबर संपूर्ण आर्ट ऑफ लिविंग स्वयंसेवक आणि बाणेर ग्रामस्थ यांनी महारुद्र पूजेचा आनंद घेतला दुपारीसत्रा मध्ये महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते श्री बाणेश्वर देवस्थान मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी शासनाकडून श्री बाणेश्वर देवस्थान मंदिरासाठी व तुकाई माता मंदिरासाठी परिसरातील विकासकामासाठी अंजून निधी उपलब्ध करुन देण्याचे नामदार पाटील यांनी मान्य केले.

त्याचप्रमाणे संसदेतील भाजपच्या माननीय खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी यांनीही श्री बाणेश्वर देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले व बाणेश्वर देवस्थान लवकरच तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त होईल साठी पाठपुरावा करू अशी माहिती दिली. बाणेर ग्रामस्थ महिला भजनी मंडळ यांनी दुपारी सुश्राव्य वारकरी सांप्रदायिक भजन केले, महाशिवरात्रीनिमित्त दिनांक 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यासाठी श्री बाणेश्वर सेवा ट्रस्टने सायंकाळी भरतनाट्यम भारतातील एक प्राचीन काळातील 2000 वर्षापासून चालत आलेली शास्त्रीय नृत्यकला, प्राचीन हिंदू मंदिरांमध्ये सादर करण्यात येणारी आणि प्रामुख्याने यामध्ये फक्त महिलांचा सहभाग असणारी कला श्रीमती चरण्या गुरुसत्या व व त्यांच्या शिष्यांगणा यांनी बाणेश्वर सभामंडपामध्ये शिवोहम या भरतनाट्यम या सुंदर अशा कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.

या कार्यक्रमानंतर श्री बाणेश्वर महाराज यांच्या बाणेश्वरभोले की बारात कार्यक्रमांमध्ये मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये सर्व श्री बाणेश्वर स्वयंसेवक व ग्रामस्थ यांनी अतिशय उत्साहामध्ये बाणेश्वर मंदिर परिसरामध्ये मिरवणूक काढून परिसर शिवमय केला. रात्री प्रथम प्रहर मध्ये श्री बाणेश्वर महाराजांची आरती समस्त बाणेश्वर देवस्थान सेवा ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर समस्त बाणेर ग्रामस्थ भजनी मंडळ यांचे भजन सादरीकरण करण्यात आले व द्वितीय प्रहरमध्ये गुरुमाऊली भजनी मंडळ दगडूशेठ हलवाई यांनी श्री बाणेश्वराच्या चरणी भजनाची सेवा देऊन महादेवांच्या आणि पार्वतीच्या विवाह सोहळ्याने सर्वत्र बाणेश्वर गुफा परिसरामध्ये चैतन्य निर्माण झाले. तृतीय प्रहर मध्ये रात्री साडेबारा ते एक च्या दरम्यान निशीत काल मध्ये सर्वांनी ओम नमः शिवाय मंत्राचे जप करून ध्यान केले. पहाटे चतुर्थप्रहरमध्ये समस्त शिवयोगी स्वयंसेवकांनी श्री महामृत्युंजय मंत्राचा जप करून सकाळी 6.30वाजता महाशिवरात्रीची सांगता केली.

या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये श्री बाणेश्वर देवस्थान चे श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट सर्व पदाधिकारी विश्वस्त त्याचबरोबर समस्त बाणेर गावातील तरुण युवक वर्ग तसेच बाणेश्वर सेवेकरी संपूर्ण कार्यक्रमांमध्ये नियोजनपूर्वक महाप्रसादाची सेवा दिली संपूर्ण दिवसभर चैतन्यमय आनंदमय भक्तीमय अशा वातावरणामध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला, श्री बाणेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व स्वयंसेवक सर्व ग्रामस्थ व सर्व शिवभक्त महिला भगिनी या सर्वांचे नियोजनामध्ये संपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल आभार व धन्यवाद व्यक्त केले.