बाणेर :
पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वे नं. ३४, क्लोरोफिया सोसायटी, बाणेर येथे ड्रेनेज लाईन विकसित करणे रु.२५ लक्ष व रस्ता ग्राऊॅंट करुन डांबरीकरण करणे रु.२५ लक्ष या एकुण रु. ५० लक्ष विकास कामांचा भुमीपुजन समारंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री समिर चांदेरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री राहुल बालवडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. स्थायी समिती अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, नगरसेवक श्री. बाबुराव आप्पा चांदेरे यांच्या प्रयत्नाला यश येऊन पुणे महानगरपालिकेच्या वतीने ,बाणेर येथील स.नं. ३४ क्लोरोफ्लाय सोसायटी येथील गोल्डस्जिम जवळ मूरकुटे गार्डन येथे ड्रेनेज लाईन टाकणे व रस्ता ग्राऊट करुन डांबरीकरण करणे, या तब्बल पन्नास लक्ष रुपये इतक्या रक्कमेच्या विकास काम मार्गी लागणार आहे हि आनंदाची बाब आहे : राहुल बालवडकर (उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
या भूमिपूजनाच्या वेळी बाणेर गावातील ज्येष्ठ नागरिक,तसेच सौ सुषमा ताम्हाणे, प्राजक्ता ताम्हाणे, हर्षल तापकीर, कृष्णा थिटे, अजिंक्य निकाळजे, पद्मविलास लाईन सोसायटी येथील महाजन सर, पाटील साहेब, हिके साहेब, सर्जेराव कदम साहेब, जनार्दन कदम साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.



More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…