June 20, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा…

बालेवाडी :

पर्यावरण उद्यान बालेवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त सुव्यद्य बाल संस्कार केन्द्र, विवेकानंद जेष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने महादेव पालखी सोहळा आणि भजन आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा जातो. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. विशेष म्हणजे यावेळी महिला दिन आणि महाशिवरात्र एकाच दिवशी आल्या मुळे दुग्ध शर्करा योग जुळून आला याच अनुषंगाने लहान मुलांनी मोठया उत्साहात श्री महादेवाची पालखी मोठया उत्साहात काढली. तर महिलांनी भजन गायली यावेळी सौ. आशा ताई शास्त्री आणि श्री. गणेश जी शास्त्री यांनी खूपच सुंदर गीते आणि भक्ती गीते सादर केली. अतीशय सुंदर कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.