June 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील नवचैतन्य हास्ययोग परिवार शाखेत महिला दिन साजरा..

बालेवाडी :

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवार बालेवाडी शाखेच्या वतीने एसकेपी कँपस, डी.आय.एम.आर. हाॕल बालेवाडी येथे महिला दिनाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात सौ.ऊषाताई गणपतराव बालवडकर यांचा विशेष सत्कार सौ.शालन पाटील, सौ.किरण कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्र संचलन श्रीमती जयश्री देशपांडे यांनी केले. सौ. सरिता कोठावदे आणि सौ.जागृती निखारे, सौ.निलीमा पवार यांनी या प्रसंगी कविता सादर केल्या. श्रीमती. वैशाली निवर्गी यांनी पुर्वीच्या महिला व सध्याच्या महिलांची स्थीती यावर विचार मांडले. महिला प्रतिनिधी सौ. आनुराधा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.