September 8, 2024

Samrajya Ladha

महिला दिन विशेष : सोनाली प्रकाश पवार (‘रिद्धीमा ब्युटी सलोन’)

पाषाण :

उत्तुंग तुझ्या भरारी पुढे
गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
अवघे विश्व वसावे

 

महिलांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी हे सांगणे गरजेचे आहे की, स्त्री खूप खंबीर असते. याच भावनांच्या अभिव्यक्तीसाठी 8 मार्चला अंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. या निमीत्ताने खंबीरपणे स्वतःला सिद्ध करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या रणागिनीची थोडक्यात ओळख..

यत्र नरीस्तु पुज्यन्ते रमंन्ते तत्र देवता !
नमस्कार मी सोनाली प्रकाश पवार व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट म्हणून गेली 9 वर्षे ‘रिद्धीमा ब्युटी सलोन’ या नावे व्यवसाय यशस्वी रित्या करीत आहे, हा व्यवसाय सुरू करतेवेळी लहान भाड्या चा जागे मधून ते आज मी स्वता चा प्रशस्त जागे मध्ये हा व्यवसाय मी माझा समाधानी ग्राहकांन मुळे करीत असून या मध्ये असंख्य अशा महिला वर्गा ची मोलाची साथ आणि आशीर्वाद माला लाभले. या साठी मी सर्वांची मना पासून ऋणी आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चढ उतारा मध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येण्या मध्ये कळत नकळत हातभार लावणाऱ्या सर्वांचे माला मना पासून योगदान मिळाले या बद्दल मी खूप आभारी आहे.

वरील संस्कृत श्लोक हा आजचा आधुनिक व संस्कृतीक अशा विकसित समाज व्यवस्थेला तंतोतंत लागू पडतो, असे माझे मत आहे आणि हीच माझा आईने दिलेली विचारांची शिदोरी मी मना मध्ये बाळगून आहे.

मी माझा व्यवसाया मध्ये काम करीत असताना समाजा मधील विविध क्षेत्रा मध्ये काम करणाऱ्या स्त्रियांशी माझा जवळून संबंध येतो तेव्हा माला निश्चित पणे असे वाटते की, आजची स्त्री ही घराचा गृहिणी पासून देशाचा सीमे पर्यंत आणि ईसरो चा याना पासून खेड्यापाड्यात ज्ञान दाना चा कार्या पर्यंत (विद्या, शक्ती, कला )अशा असंख्य गुणांनी कार्यरत आहे. अशा सर्व प्रकारचा नवयुगातील सोबतीना तमाम जिजाऊंच्या लेकींना माझा कडून जागतिक महिला दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!