June 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे नारी शक्तीवंदन आणि रॅली मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे महिला दिनाच्या निमित्ताने भाजपा उत्तर आणि दक्षिण कोथरूड विधानसभा महिला मोर्चातर्फे नारी शक्तीवंदन कार्यक्रम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला आणि मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमच्या गीताने झाली. जयप्रिया बालचंद्रन जी आणि नारी शक्तीवर मीरा, यती, पवनी आणि जया जी यांच्या नृत्य सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उत्तर आणि दक्षिण कोथरूड महिला मोर्च्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नारी शक्ती वंदन म्हणजे काय या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले आणि सरकारी योजना संबंधित तपशीलवर चर्चा झाली. महिलांना पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान प्रमाणपत्र इत्यादींबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यास मदत करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिली.

नामदार चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडून अल्पोपहार आणि छोटी भेट देऊन नारीशक्तीवंदन रॅलीने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व उत्तर आणि दक्षिण कोथरूड महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.