October 18, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन; सहभागी होण्याचे सनी निम्हण यांचे आवाहन

पुणे :

पाषाण येथील सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ३ ते 9 मार्च दरम्यान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या भक्तिमय वातावरणात रमण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी कीर्तन सप्ताहात आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन युवा उद्योजक व मा. नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.

सप्ताहातील पहिले पाच दिवस सायंकाळी 6.30 ते 8.30 किर्तन होणार आहेत तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १० ते १२ दरम्यान व काल्याच्या दिवशी सकाळी 10 ते 12 दरम्यान कीर्तन होणार आहे. या दरम्यान अनेक मान्यवर कीर्तनकारांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे.

यंदाच्या अखंड हरीनाम सप्ताहात 3 मार्चला (रविवार) रामायानाचार्य ह. भ. प. कैलास महाराज खंडागळे, 4 मार्चला (सोमवार) ह. भ. प. कृष्णा महाराज चवरे, ५ मार्चला (मंगळवार) ह. भ. प. उमेश महाराज दशरथे, 6 मार्चला (बुधवार) ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे, 7 मार्चला (गुरुवार) ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, ८ मार्चला (शुक्रवार) महाशिवरात्रीच्या दिवशी ह. भ. प. संतोष महाराज पायगुडे, 9 मार्चला (शनिवार) काल्याच्या दिवशी ह. भ. प. पुंडलिक महाराज मोरे यांचे कीर्तने होणार आहेत.

महाशिवरात्रीच्या भक्तिमय वातावरणात रमण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी कीर्तन सप्ताहात आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट व माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने करण्यात आले आहे.