October 18, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी, साई चौक पाषाण, सुतारवाडी गावठाण, लमाण तांडा परीसरात मतदार सर्वेक्षण मोहीम व मतदार नाव नोंदणी अभियानस मोठा प्रतिसाद..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी, साई चौक पाषाण, सुतारवाडी गावठाण, लमाण तांडा येथे भाजपा कोथरुड विधानसभा उत्तर विभाग सरचिटणीस सचिन दळवी यांच्या वतीने मतदार सर्वेक्षण मोहीम व मतदार नाव नोंदणी अभियान २३ ते २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राबविण्यात आले होते. या अभियानास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत अभियानाचा लाभ घेतला.

यावेळी नवीन मतदार नाव नोंदणी, मतदार कार्ड दुरुस्ती व मतदार यादीतील नाव स्थलांतर अशी कामे करण्यात आली. यामुळे नागरिकांना भविष्यात मतदान करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली.